जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळा मधील घटणारी पटसंख्या. अध्यापनातील स्थैर्य. शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात शिक्षकाच्या ऑनलाईन बदलांची सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022 ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनाकडून सूचना/निवेदने शासनास प्राप्त झाले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रिट याचिका क्रमांक 677/2023 मध्ये दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी च्या पत्रांन्वये माननीय उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी दिनांक 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यास गट नेमण्यात आला. सध्या अभ्यास गटांनी केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हाअंतर्गत बदली बाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
जिल्हा परिषद शिक्षक बदली शासन निर्णय
अ.क्र. | शासन निर्णय विवरण | शासन निर्णय दिनांक | शासन निर्णय pdf | शेरा |
1. | जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलण्यासाठी सुधारित धोरण | १८ जुन २०२४ | येथे क्लिक करा | या शासन निर्णयानुसार शिक्षक बदली २०२५ होणार |
2 | जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत | १४ मार्च २०२३ | येथे क्लिक करा | अभ्यासगट |
3 | जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलण्यासाठी सुधारित धोरण | ७ एप्रिल २०२१ | येथे क्लिक करा | अधिक्रमित |
4. | विशेष संवर्ग भाग -१ व विशेष संवर्ग भाग -२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटींबाबत शासन पत्र | दिनांक २ एप्रिल २०२५ | येथे क्लिक करा | जिल्हांतर्गत बदलीसाठी लागू |
5 | जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदली विशेष संवर्ग भाग- १ व विशेष संवर्ग भाग-२ मधील अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी | दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ | येथे क्लिक करा | जिल्हांतर्गत बदलीसाठी लागू |