एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढविण्यात आला.

आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी यांना आज अनोखी भेट दिली आहे. महाराष्ट्र सरकारने आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ करून  कर्मचाऱ्यांना सुखद अनुभव दिला. या सदर्भातला शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे.

महागाई भत्ता निर्णय.

आज राज्य सरकारच्या वित्त विभागाने महागाई भत्ता वाढ संदर्भात शासन निर्णय जारी केलेला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजेच एकूण 3% ने महागाई भत्ता वाढविण्यात आलेला आहे.

1 जुलैपासून मिळणार थकबाकी..

या शासन निर्णयानुसार वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2024 पासून लागू होईल. हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाईल. म्हणजेच 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 असा सात महिन्याचा वाढीव महागाई भत्ता फरक फेब्रुवारी 2025 च्या वेतनात दिला जाईल. गेल्या अनेक दिवसापासून महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी सर्व शासकीय कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्याकडून केली जात होती. सरकारने सध्याच्या महागाईचा विचार लक्षात घेता महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

17 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आलेला आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आता वाढीव महागाई भत्तासह पगार मिळणार आहे.

शालार्थ बिले पुन्हा पाठवावी लागणार…

महागाई भत्ता वाढ शासन निर्णय निर्गमित होण्याअगोदर राज्यातील सर्व शिक्षक यांच्यासाठी असलेली शालार्थ प्रणाली तसेच इतर कर्मचारीसाठी असलेली सेवा वेतन प्रणाली मध्ये वेतन दिले तयार करून फॉरवर्ड केली होती. परंतु आता वाढीव महागाई भत्त्यासह दिले पाठवावी लागणार असल्यामुळे प्रथम फॉरवर्ड केलेली बिले रिजेक्ट करावी लागतील. त्यामुळे वेतन होण्यास विलंब लागू शकतो.

इन्कम टॅक्स मध्ये कपात..

वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये तयार करण्यात आलेली आयकर विवरण पत्रे देखील सुधारित पद्धतीने तयार करावी लागणार आहेत. वित्तीय वर्ष 2024-25 मधील लागलेला इन्कम टॅक्स मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महागाई भत्ता थकबाकी सह मिळणार असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे.

एकंदरीत महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचा लाभ देण्याचे देखील कर्मचाऱ्यांमधून आवाहन होत आहे.

Scroll to Top