एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

जिल्हा परिषद शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर

  • महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • दिनांक 23.05.2023 च्या शासननिर्णयानुसार आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे.
  • यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि,संबधित जिल्हापरिषदा कडून अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन  पोर्टलवर रिक्त दाखवू नये.
  • ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील,अशा शिक्षकांची संख्या ऑनलाईन  पोर्टलवर दर्शविण्यात यावी .
  • ऑनलाईन आंतर जिल्हा बदली सन 2024-25  चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे….
    अनुक्रमांक जिल्हा परिषद व मे.विन्सीस आयटी सर्विसेस प्रा. लिमिटेड यांनी करावयाची कार्यवाही   कालावधी
    1 शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे दिनांक 10 मार्चपर्यंत 2025
    2 जिल्हा परिषदांनी बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व रिक्त पदाची माहिती अपलोड करणे.

    ( यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबधित जिल्हा परिषदाकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नये )

    दिनांक 11 मार्च ते 13 मार्च 2025
    3 शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे . दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2025
    4 अर्जाची पडताळणी करणे दिनांक 21 मार्च ते 25 मार्च 2025
    5 न्यायालयीन प्रकरणे/विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदली बाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे . दिनांक 26 मार्च ते 27 मार्च 2025
    6 आंतर जिल्हा बदली प्रकिया पूर्ण करणे. दिनांक 28 मार्च ते 6 एप्रिल 2025
Scroll to Top