बालकाचे व्यक्तिमत्त्व घडवत असताना त्याच्या शिक्षणाची खरी सुरुवात होते. आई बालकाची पहिली गुरू असते, मातेलाच त्याच्या शिक्षणाच्या पावलोपावली निर्माण होणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजतात. त्यावर प्रभावी उपाय योजून माता त्या सोडवू शकते, म्हणूनच शाळेतदेखील अशा मातांचा संघ प्रभावीपणे काम करू शकतो.
- माता पालक संघाची रचना :
- अध्यक्ष मुख्याध्यापक
- सचिव ज्येष्ठ स्त्री शिक्षिका, (स्त्री शिक्षिका नसल्यास अंगणवाडी ताई)
- सदस्य प्रत्येक विद्यार्थ्यांची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही)
अनुक्रमांक | प्रतिनिधी | पदनाम |
1 | मुख्याध्यापक | अध्यक्ष |
2 | पालक | उपाध्यक्ष |
3 | शिक्षक | सचिव |
4 | पालक | सहसचिव |
5 | विद्यार्थिनी | सहसचिव |
6 | प्रत्येक इयत्तेचे वर्गशिक्षक | सदस्य |
7 | प्रत्येक इयत्तेसाठी एक पालक | सदस्य |
माता-पालक संघाच्या नियमित बैठक आयोजित करून मुलांच्या विकासाबाबत मातांशी संवाद साधावा. माता-पालकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करावे.
टीप:- सर्व मिळून कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १७ कार्यकारी सदस्य असावेत व ७५ टक्के पेक्षा जास्त महिला असाव्यात