एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

मोफत पाठ्यपुस्तके योजना

पाठ्यपुस्तकाअभावी प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत अथवा विद्यार्थी गळती होऊ नये तसेच शिक्षणातील दरी कमी व्हावी यासाठी समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्याथ्यर्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण योजना लागू करण्यात आली आहे.

लाभार्थी : इयत्ता पहिली ते आठवीमधील १०० टक्के विद्यार्थ्यांना पुरवठा केला जातो.

योजनेची कार्यवाही : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात यू-डायसवर नोंदविलेल्या पटसंख्येच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची संख्या निश्चित करतात. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचा साठा नोंदवहीमध्ये नोंदविला जातो. ही पुस्तके शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व ग्रामस्थ यांच्या समक्ष वरील लाभार्थीना शाळा सुरू झाल्या दिवशी वाटप केली जातात. शालेय स्तरावर पाठ्यपुस्तके वाटप केल्याचा अहवाल मुख्याध्यापकांकडून गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर केला जातो.

Scroll to Top