राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, महानगरपालिका/नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध शैक्षणिक संघटनाकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत. तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरविणे बाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक/शाळेची वेळ यामध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे.
सदर बाब विचारात घेता, राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी – सकाळी 7.00 ते 11.15 व माध्यमिक शाळासाठी सकाळी 7.00 ते 11.15 अशी करण्यात यावी. शैक्षणिक सत्र २०२५ साठी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने या कालावधीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येईल. उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळविण्यात यावे.
1. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात.
2. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नये.
3. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
4. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याचे खात्री करणे.
5. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
6. टरबूज,खरबूज, संत्री, द्राक्ष,अननस,काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखे उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
7. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
8. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनेचा वापर करणे.
9. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे.
10. उन्हात बाहेर पडणे टाळावे.
उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळेसाठी वेळापत्रक |
|
प्राथमिक शाळा |
|
वेळ |
तासिका |
७.०० ते ७.१५ |
परिपाठ |
७.१५ ते ७.४५ |
तासिका -१ |
७.४५ ते ८.१५ |
तासिका -२ |
८.१५ ते ८.४५ |
तासिका-३ |
८.४५ ते ९.१५ |
तासिका-४ |
९.१५ ते ९.४५ |
भोजन सुट्टी |
९.४५ ते १०.१५ |
तासिका -५ |
१०.१५ ते १०.४५ |
तासिका -६ |
१०.४५ ते ११.१५ |
तासिका -७ |
उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळेसाठी वेळापत्रक |
|
माध्यमिक शाळा |
|
वेळ |
तासिका |
७.०० ते ७.१५ |
परिपाठ |
७.१५ ते ७.४५ |
तासिका -१ |
७.४५ ते ८.१५ |
तासिका -२ |
८.१५ ते ८.४५ |
तासिका-३ |
८.४५ ते ९.१५ |
तासिका-४ |
९.१५ ते ९.४५ |
भोजन सुट्टी |
९.४५ ते १०.१५ |
तासिका -५ |
१०.१५ ते १०.४५ |
तासिका -६ |
१०.४५ ते ११.१५ |
तासिका -७ |
११.१५ ते ११.४५ |
तासिका -८ |