एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ

संदर्भ :- ०१ जा.क्र.राशैसंप्रपम/मूल्यमापन /SQAAF /२०२४-२५/००५८२ दिनांक ०३/०२/२०२५

                 ०२. जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /SQAAF /२०२४-२५/०१०९७ दिनांक २७/०२/२०२५

                  ०३. जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /SQAAF /२०२४-२५/०१४१६ दिनांक १२/०३/२०२५

उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक ०१ अन्वये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेचे स्वंयमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे यांच्या www.maa.ac.in या वेबसाइटवरील SQAAF टॅबवर http://scert-data.web.app/ या नावाने स्वयं-मूल्यकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संदर्भ क्रमांक ०२ नुसार दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि,आजतागायत १००% शाळांची स्वंय-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही.त्यामुळे,शाळांचे स्वंय-मूल्यांकन होणेसाठी दिनांक १०.०४.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 
तरी,आपल्या विभागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची स्वंय-मूल्यांकन नोंदणी व पूर्तता विहित कालावधीत १००% होईल याची दक्षता घ्यावी.

SQAAF मुदतवाढ पत्र (PDF)SQAAF मुदतवाढ-10042025

राहुल रेखावर, भा.प्र.से.
संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे .

Scroll to Top