एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

PM पोषण शक्ती निर्माण योजना

  • योजनेस सुरवात दिनांक 22 नोव्हेंबर, 1995.

शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सदर योजना 22 नोव्हेंबर, 1995 पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्याथ्यर्थ्यांना प्रति महा 3 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. (Take Home Supplement) सन 2001 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे असे आदेश दिले व त्यानुसार सन 2002 पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देण्यात येतो. सन 2008 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येतो.

  • योजनेची ठळक वैशिष्टे

* प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे.

* प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.

* शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.

भेदभाव नष्ट करणे.

* विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.

  • राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, मदरसा / मक्तबा, राष्ट्रीय बालकामगार शाळेतील विदयार्थी (NCLP शाळेतील विदयार्थ्यांना उच्च प्राथमिक नुसार लाभ) इ. ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्याथ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो.

PM POSHAN शक्ती निर्माण योजना संदर्भात शासन निर्णय

क्रमांक

1

शीर्षक
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा....

जी.आर.दिनांक

२८ जानेवारी २०२५

क्रमांक

2

शीर्षक
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत नवीन पाक कृती निश्चित करण्याबाबत

जी.आर.दिनांक

११ जुन २०२४

क्रमांक

3

शीर्षक
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत "स्नेहभोजन" उपक्रम राबविण्याबाबत

जी.आर.दिनांक

१३ ऑगस्ट २०१५

क्रमांक

4

शीर्षक
केंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमावली २०१५ च्या अंमलबजावणीबाबत

जी.आर.दिनांक

२ फेब्रुवारी २०१६

क्रमांक

5

शीर्षक
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत....

जी.आर.दिनांक

४ मार्च २०२५

क्रमांक

6

शीर्षक
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत...

जी.आर.दिनांक

९ फेब्रुवारी २०२३

क्रमांक

7

शीर्षक
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत...

जी.आर.दिनांक

१८ डिसेंबर २०२३

क्रमांक

8

शीर्षक
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम उपक्रम राबविण्याकरिता पारदर्शक सूचना....

जी.आर.दिनांक

२५ जुलै २०२४

क्रमांक

9

शीर्षक
केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM -पोषण) करणेबाबत.....

जी.आर.दिनांक

४ नोव्हेंबर २०२२

Scroll to Top